तू आलीस खरी पण

भेट अशी की ती
जणू भेट झालीच नाही;
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही...!

होतीस समोर जरी तू
मनात तुझ्या वादळ वेगळे;
सोबत होतो आपण पण
मिलाप भासलाच नाही...!

जबाबदाऱ्यांचं ओझं म्हणू
की दुनियादारी च दडपण;
एकत्र होतो आपण पण
विरघळनं भासलच नाही...!

द्विधा मनस्थिती म्हणू की
घालमेल मनाची तुझ्या;
हात हातात तरी पण
साथ भासलीच नाही...!

नसेल तुला खात्री तरीही
सदैव तुझाच मी;
नसता कधी सोबत तरी पण
वेगळे असे भासलोच नाही....!

पण आज.....
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही...!

विशाल झावरे पाटिल
०९/१०/२०२३

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक



भेट अशी की ती
जणू भेट झालीच नाही;
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही…!

होतीस समोर जरी तू
मनात तुझ्या वादळ वेगळे;
सोबत होतो आपण पण
मिलाप भासलाच नाही…!

जबाबदाऱ्यांचं ओझं म्हणू
की दुनियादारी च दडपण;
एकत्र होतो आपण पण
विरघळनं भासलच नाही…!

द्विधा मनस्थिती म्हणू की
घालमेल मनाची तुझ्या;
हात हातात तरी पण
साथ भासलीच नाही…!

नसेल तुला खात्री तरीही
सदैव तुझाच मी;
नसता कधी सोबत तरी पण
वेगळे असे भासलोच नाही….!

पण आज…..
तू आलीस खरी पण
तू भासलीच नाही…!

विशाल झावरे पाटिल
०९/१०/२०२३

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक

Author