तिच्या आणि त्याच्या
संबंधात कधीही ट्विस्ट
दिसला नाही…
दूरच्या डोगरासारखे
सर्व काही मस्त दिसत होते
डोगराजवळ गेले की
सर्व खाज-खळगे दिसतात
चढ-उतार दिसतो
तसेच त्या दोघांचे होते बहुतेक
मनात विचार आला ..
मला काय गरज त्या
डोगराजवळ जायची
पण एकदा डोगरच
समोर आला आणि
अपरिहार्यपणे ट्विस्ट दिसला
सगळ्यांचे असेच असते
म्हणून डोगराजवळ जाणे
शक्यतो टाळावे कारण…
कधीकधी आपणच त्या
डोगराचा भाग होतो….
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 11