ती अशीच

ती अशीच

ती अशीच अचानक भेटली

तिचं नाव काय… गाव काय

काही काही माहित नव्हतं



<ती अशीच
<ती अशीच अचानक भेटली
<तिचं नाव काय... गाव काय
<काही काही माहित नव्हतं



<उगीच थबकायची
<चाहूल घ्यायची
<काहीही न बोलता
<निघून जायची



<गर्दीत मिसळून
<लपंडाव मांडायची
<स्वतःच रुसून
<स्वतःशीच भांडायची



<कधी म्हणाली होती
<'
<भेटायला मला
<माझाच गंध होऊन



<काय ते तिचं तिलाच माहित
<मुक्यानंच बोलायची खूप
<सांजेच्या क्षितीजासारखा
<असायचा तिचा हुरूप



<कधी भिजल्या डोळ्यांची
<... उभी सामोरी
<कधी वळून पाहणारी
<...हळवी ... पाठमोरी



<कधी अधीर अधीर
<ओथंबल्या घानांसारखी
<तर कधी पावसानंतरच्या
<... निःशब्द मनासारखी



<गंधित मध्यरात्रीसारखं
<बेनाम एक नातं
<काळजाचा खोपा करून
<कसं तिने जपलं होतं



<....काही
<तिचं
<काही
<ती



<ती



<
< mulegajanan57@gmail.com

Author