तंदुरी चिकन

चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.



p-762-Tandoori-chicken-300
p-762-Tandoori-chicken-300

साहित्य : मध्यम आकाराच्या चिकनचे 2 तुकडे, तिखट आवश्कयतेनुसार, 3 चमचे लिंबाचा रस, 100 ग्रॅम लोणी

पेस्ट बनविण्यासाठी साहित्य :
100 ग्रॅम दही, 20 ग्रॅम आलं पेस्ट, 1 चमचा जीरं पूड, मीठ चवीप्रमाणे, 100 ग्रॅम क्रीम, 20 ग्रॅम लसणाचे पेस्ट, 1/2 गरम मसाला.
कृती : चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी. 4-5 तासानंतर चिकनला एका सळईत ओवावे. दोन्ही तुकडे एक-दुसर्‍यापासून 1-2 इंचाच्या अंतरावर असावे. ओवनला 350 डिग्री फेरनहाइट वर गर्म करावे. त्यात 8-10 मिनिटासाठी चिकनला रोस्ट करावे.
चिकनला बाहेर काढून चारीबाजूने लोणी लावून परत 5 मिनिट लिंबु आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.

संजीव वेलणकर पुणे.
9422301733

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →