व्यक्ती-परिचय

वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर

Category:

 

भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गाणारी बोटे.. गोविंदराव पटवर्धन

Category:

 

गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

कथा

हॉटेलातल्या सूक्ष्म कथा

Category:

 

एक
प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.

दोन
हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.

परिचय – परिक्षण

सात बारा व हक्क नोंद

Category:

 

वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे.

व्यक्ती-परिचय

पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

Category:

 

गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास

Category:

 

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जात.त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले होती.१९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है..’ या गाण्याने पंकज उदास घराघरांत पोहोचले.

व्यक्ती-परिचय

श्रीपाद रेडीओचे मालक व रेडीओचे संग्राहक श्रीपाद कुलकर्णी

Category:

 

श्रीपाद कुलकर्णी १९७८ साला पासून रेडिओचे संग्रह करत आहेत. श्रीपाद कुलकर्णी यांनी १९७८ साली चिपळूण येथे नोकरीला असताना एका स्थानिक स्टोअरमधून विकत घेतलेला फिलिप्स रेडिओ सेट हा त्यांचा पहिला सेट. श्रीपाद कुलकर्णी यांच्या कडे ४० हून अधिक vintage रेडिओ सेट्स आहेत.

लेखसंग्रह

बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पाच वर्ष

Category:

 

२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.