व्यक्ती-परिचय

क्रांतिकारक मंगल पांडे

Category:

 

३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”

क्रीडा-विश्व

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॉर्ज डकवर्थ

Category:

 

त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट हे दोन महायुद्धाच्या मधल्या कालखंडात खेळले. त्या काळात क्रिकेटच्या खेळाडूंना खूप प्रसिद्धी मिळत असे. ते जेव्हा अपील करत असत तेव्हा त्यांचा आवाज हा मोठा होता , अपील करताना ते मोठयाने विशिष्ट शब्द म्हणजे ‘ ऑझ दॅट ‘ हे शब्द बोलत . ह्याचा खरा उच्चार ‘ हाउज दॅट ‘ असे . पुढे तो शब्द खूप पॉप्युलर झाला. त्यामुळे ते अनेकांच्या लक्षात रहात असत.

व्यक्ती-परिचय

जयंत नारळीकर

Category:

 

आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.

व्यक्ती-परिचय

प्रा. रंगनाथ पठारे

Category:

 

प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.

साहित्य - ललित

बाप’ दिवस

Category:

 

लेखकांमध्ये प्रत्येक पिढीनुसार, नवे जुने ‘बाप’लेखक असू शकतात. मी आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य वाचलं. खरंच ती माझ्या दृष्टीनं ‘बाप’माणसंच होती. त्यांची पुस्तकं वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची लेखनशैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला.

क्रीडा-विश्व

बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर

Category:

 

१९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.हल्ली बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असेच म्हणावे लागेल .

क्रीडा-विश्व

क्रिकेटपटू भागवत चंद्रशेखर

Category:

 

चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले.

साहित्य - ललित

जीए !

Category:

 

जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित – अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले.

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १२

Category:

 

उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

साहित्य - ललित

मोहा’ची कात्री

Category:

 

गंगारामने असा अघोरी खून केलेला पाहून त्याचे मामा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. गंगारामला या गावात आणल्याचा त्यांना आता पश्र्चाताप होऊ लागला.पोलीस तपास सुरु झाला. गंगारामच्या मामांना पोलीसांनी चौकशीसाठी चौकीत बोलाविले. मामांच्या साध्यासरळ जीवनात असा मानहानीचा प्रसंग कधीही आला नव्हता. त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

शेवटी तपास करणाऱ्या पोलीसांना गंगाराम व त्या