कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया यात फरक काय?
Category:
लेखसंग्रहआपण एखादे घर नव्याने विकत घेतो तेव्हा या संज्ञांचा आपल्याला विचार करावा लागतो. कारण या संज्ञा घराच्या क्षेत्रफळाशी निगडीत आहेत. संख्येबाबत विचार करता कार्पेट एरिया ही इतर दोन एरियांच्या तुलनेत सगळ्यात कमी असते. त्याचा खरा अर्थ असा की संपूर्ण घरातील सर्व खोल्यांच्या (हो, संडास, बाथरूम धरून) सगळया भितीना चिकटेल (वॉल टू वॉल) अशी सतरंजी (कार्पेट) अंथरली तर तिचे जे क्षेत्रफळ भरेल ते म्हणजे एकाद्या घराचा कार्पेट एरिया. घराच्या भिंती वजा करून मोजलेला एरिया.
January 11, 2023