दूतवारी देवत्व व सात्विकता फुलविणारी
Category:
लेखसंग्रहअवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! असा नुसता उद्घोष जरी ऐकू आला तरी भगवान श्री दत्तात्रेयांची मनमोहक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. भारतात परमेश्वराची आराधना करणारे अनेक संप्रदाय आहेत. त्यात दत्तसंप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही महान विभूती होऊन गेली. पवित्र, सात्विक आणि धर्मवान अशी ख्याती असलेले अत्रि ऋषी व पतिव्रता सुस्वरूप आणि कोणतीही असूया नसलेल्या अनुसूया यांच्या पोटी साक्षात त्रिदेव परब्रह्म म्हणून ते जन्मास आले.
April 6, 2023