लेखसंग्रह

पर्यटन आणि आरोग्य

Category:

 

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ.

  June 1, 2023


लेखसंग्रह

करावे पर्यटन

Category:

 

डॉ. रिमा वीस दिवसानंतर आज पुन्हा क्लिनिकला आली तेव्हा किती वेगळी दिसत होती. एक वेगळाच तजेला तिच्यात दिसत होता. एक वेगळाच उत्साह दिसत होता. त्याच्याआधी पाच-सहा महिने खूपच व्यग्र गेले होते. सतत पेशंट्स बघणे, कधी या क्लिनिक तर कधी त्या क्लिनिकनला जाऊन.

  May 28, 2023


लेखसंग्रह

हॉटेल आणि आरक्षण

Category:

 

जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते.

  May 25, 2023


लेखसंग्रह

नकाशे

Category:

 

आता सर्वसामान्य माणसाचा आर्थिकस्तर उंचावल्याने आणि नोकरदारांची अनेक कार्यालये कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन प्रवास पर्यटनासाठी आर्थिक सवलती देत असल्याने लोकांचा विविध प्रकारच्या पर्यटनाकडे ओढा वाढलाय. गतिमान, यांत्रिक जीवनात आपली बॅटरी चार्ज होण्यासाठी लोकांनाही एक सुखद बदल म्हणून प्रवासाला जाण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे चार सहा दिवस वेगळ्या वातावरणातील पर्यटनाला जाण्यासाठी त्यांचा मनोदय असतो.

  May 18, 2023


लेखसंग्रह

स्टेट बँक माझी सखी

Category:

 

स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती.

  May 17, 2023


लेखसंग्रह

मी बँकेमुळे घडलो

Category:

 

मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं.

  May 15, 2023


लेखसंग्रह

प्रवासाला निघताना

Category:

 

पूर्वीच्या काळी प्रवास म्हणजे केवळ कामापुरता केला जायचा. पायी अथवा बैलगाडीने एका जागेतून दुसऱ्या जागी जाणं एवढंच होतं. मजल दरमजल केलेल्या या प्रवासात एक वळकटी, तांब्या, घोंगडी आणि सोबतीला बहु उपयोगी असा सोटा. प्रवास फक्त दिवसा करायचा आणि संध्याकाळी एखाद्या धर्मशाळेत किंवा देवळाबाहेर मुक्काम. तीर्थक्षेत्राला जाणं हा जीवनातला मोठा आणि किंबहुना शेवटचा आणि लांबचा प्रवास.

  May 14, 2023