No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ९)

Category:

 

हळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले .

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ८)

Category:

 

मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला. तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ७ )

Category:

 

कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ६ )

Category:

 

महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते .

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ५)

Category:

 

लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता. खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला.