लेखसंग्रह
C-वर्षा पतके – थोटे
साहित्य - ललित
मनतरंग
Category:
साहित्य - ललितआकाश अगदी निरभ्र आहे. दुधापेक्षाही शुभ्र चांदणं पड़लं आहे. बाकी सार शांत आहे. खेळून दमलेलं लहान मुलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणी त्याला साद घालीत आहे एक टिटवी.