दिनविशेष

एअर बस ए ३८० सिंगापूर एअरलाइन्स या विमानाचे प्रथम प्रवासी उड्डाण

Category:

 

चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए ३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एअरलाइन्सने २५ ऑक्टोबर २००७ सुरु केली.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

बार्बीडॉलची निर्माती रुथ हँडलर

Category:

 

खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

भारताचे माजी तेज गोलंदाज रमाकांत देसाई उर्फ ‘टायनी’ देसाई

Category:

 

रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले.

  April 27, 2022


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गन्स ऑफ नेव्हरॉन’ हा इंग्रजी क्लासिक युद्धपट प्रदर्शित झाला

Category:

 

ॲ‍लिस्टर मॅक्लीन यांच्या ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’ याच नावाच्या कादंबरीवर आधारित, जेली थॉमप्सन दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे १६० मिनिटांचा असून यात ग्रेगरी पेक, डेव्हिड निवेन, अँथनी क्वीन, अँथनी क्वेल आदी एकापेक्षा एक मातब्बर कलावंत आहेत. या चित्रपटाला ऑस्करची ६ नामांकने मिळाली होती तर २ गोल्डन ग्लोब अवॉर्डसह १ ऑस्कर मिळाले होती.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील

Category:

 

सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो. पहिली अकरा वर्षे विखे−पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

खगोलशास्त्राचे अभ्यासक शं. बा. दिक्षित

Category:

 

“भारतीय ज्योतिषशास्त्र” हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले ! या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. ‘कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत’ या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला.

  April 27, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी व नकलाकार राजाभाऊ चिटणीस

Category:

 

माणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे.

  April 27, 2022


दिनविशेष

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

Category:

 

“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते.

  April 26, 2022


‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला
दिनविशेष

‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला

Category:

 

स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो. अशी या चित्रपटाची कथा होय.

  April 26, 2022