दिनविशेष

महाराष्ट्र दिन

Category:

 

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ हे नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’ असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यठमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली. 

  May 1, 2022


व्यक्ती-परिचय

संपादक व प्रकाशक अरुण दिगंबर शेवते

Category:

 

शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ प्रकाशनाने काढलेल्या ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाच्या चाळीस आवृत्त्या निघाल्या. ‘नापास मुलांची गोष्ट’ मुंबई विद्यापीठात अभ्यास क्रमात सामील केले आहे.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ उद्योगपती व महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा

Category:

 

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा यांनी महिंद्रा कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली होती. 

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

वाचस्पती अरविंद मंगरूळकर

Category:

 

मंगरूळकर यांची व्याकरणातील तलस्पर्शी दृष्टी ‘मराठी व्याकरणाचा पुनर्विचार’ या ग्रंथात, तर वाङ्मयाची सूक्ष्म आणि साक्षेपी जाण, ‘मम्मटाचा काव्यप्रकाश’ (सहलेखक अर्जुनवाडकर) आणि ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात व्यक्त झाली आहे. त्यांना सर्वच ललितकलांविषयी जिव्हाळा होता. त्यांची संगीतातील व्यासंगी-जाणकारी त्यांच्या ‘नादातील पाउले’ या पुस्तकातील विविध लेखांत प्रकट झाली आहे. अरविंद मंगरूळकर हे “कालिदासाचे मेघदूत”, “नीतिशतक” , “मराठी घटना रचना आणि परंपरा” अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे संपादक देखील होते.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

अभिनेते प्रतिक गांधी

Category:

 

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या आणि सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये प्रतीक गांधी यांनी हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली आहे.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे

Category:

 

१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले.

  April 30, 2022


दिनविशेष

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला

Category:

 

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’चित्रपटाने ‘दणदणीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. सैराटला अजय-अतुल यांचे संगीत होते. नागराज मंजूळे यांची उत्कृष्ट पटकथा व लेखक होते. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के

Category:

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील खलनायकी भूमिकेमुळे शिर्कें यांच्या कारकीर्दीला गती मिळाली. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘घनचक्कर’, ‘धडाकेबाज’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘अबोली’, ‘रात्र आरंभ’, ‘मराठा बटालियन’, ‘व्हेंटिलेटर’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. ‘तिरंगा’, ‘वंश’, ‘जुडवा’, ‘खुदा गवाह’, ‘जय किशन’, ‘जीत’, ‘काला साम्राज्य’, ‘इश्क’, ‘भाई’, ‘टारझन द वंडर कार’ हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

लेखिका,गायिका, नाट्यअभिनेत्री माधुरी पुरंदरे

Category:

 

मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

  April 30, 2022


व्यक्ती-परिचय

अनुवादक रवींद्र गुर्जर

Category:

 

‘पॅपिलॉन’ या पहिल्याच अनुवादित पुस्तकामुळे अफाट प्रसिद्धी मिळालेल्या गुर्जरांची आजपावेतो ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी केलेले सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, इस्राइलची गरुडझेप, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, दी पेलिकन ब्रीफ, फर्स्ट टू डाय, सुवर्णयोगी यांसारखे एकाहून एक सरस अनुवाद तुफान लोकप्रिय ठरले आहेत.

  April 30, 2022