दिनविशेष

ज्ञानपीठ पुरस्कार

Category:

 

२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

दिनविशेष

एअर बस ए ३८० सिंगापूर एअरलाइन्स या विमानाचे प्रथम प्रवासी उड्डाण

Category:

 

चार इंजिने असलेले हे विमान ५२५ ते ८५३ प्रवाशांना १५,७०० कि.मी. पर्यंत नेऊ शकते. म्हणजेच हे विमान डॅलस ते सिडनी दरम्यान विनाथांबा जाऊ शकते. एअरबस ए ३८० चे पहिले उड्डाण २७ एप्रिल २००५ रोजी पार पडले तर ह्या विमानाची पहिली प्रवासी सेवा सिंगापूर एअरलाइन्सने २५ ऑक्टोबर २००७ सुरु केली.

दिनविशेष

दादरमधील शिवाजी मंदिराचा शुभारंभ

Category:

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला.

दिनविशेष

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११४ वा वर्धापन दिन

Category:

 

१९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते.

‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला
दिनविशेष

‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रदर्शित झाला

Category:

 

स्वत: अनाथ असलेला ब्रह्मचारी (शम्मीकपूर) अनेक अनाथ, असहाय मुलांचा सांभाळ करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने मुलांचा सांभाळ करणं त्याला अत्यंत कठीण जात असतं. पण तरीही तो हसतमुखाने त्यांना आशावादी बनविण्याचा प्रयत्न करत असतो. अशी या चित्रपटाची कथा होय.

दिनविशेष

बॉम्बे चे मुंबई – २६ वर्षे पूर्ण

Category:

 

अनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.

दिनविशेष

‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं

Category:

 

या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता.

दिनविशेष

भारतात रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात

Category:

 

“हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते.

दिनविशेष

आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस

Category:

 

हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन. सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू ४ मे रोजी झाला, जे की एक संत आणि फायर फायटर होते. असे म्हणतात की एकदा त्याच्या गावात आग होती, त्याने फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण गाव आग विझविली. त्यानंतर, युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी ४ मे रोजी फायर फाइटर दिवस साजरा केला जातो.

दिनविशेष

अमर अकबर ॲ‍न्थनी’ चित्रपटाची ४५ वर्षे

Category:

 

मनमोहन देसाईं यांनी या चित्रपटात आपला लाॅस्ट ॲ‍ण्ड फाऊंड हाच हुकमी फाॅर्मुला वापरला. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई पित्यासह भेटतात, आणि ते खलनायकाचा निप्पातही करतात. ही त्यांची हुकमी थीम या चित्रपटात सर्वधर्मसमभाव पध्दतीने मांडली. या चित्रपटातील तीन भाऊ एकाच वेळेस आपल्या आईला रक्तदान करतात असाही एक हास्यास्पद प्रसंग या चित्रपटात आहे. पण प्रेक्षकांना तेही आवडले.