दिनविशेष

जागतिक होमिओपॅथी दिन

Category:

 

होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात.

दिनविशेष

पिंगपाँग डिप्लोमसीची ५२ वर्षे

Category:

 

१९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा.

दिनविशेष

मुंबईतील प्रार्थना समाजाची स्थापना

Category:

 

१८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापाऱ्यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला.

दिनविशेष

झपाटलेला’ या चित्रपटाला २९ वर्षे झाली

Category:

 

अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे.

दिनविशेष

गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले

Category:

 

ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.

दिनविशेष

पुथंडु म्हणजेच तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण

Category:

 

दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला ‘चैत्तिरीई विशू’ असे म्हणतात. केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते. तामिळनाडू व्यतिरिक्त श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस आणि इतर देशांमध्येही पुथंडु साजरा केला जातो.

दिनविशेष

द बर्निंग ट्रेन चित्रपट

Category:

 

चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.

दिनविशेष

भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध झाली

Category:

 

या योजना काळात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी २.१ टक्क्यांनी वाढ घडवून आणण्याचे उद्दिष्ट होते, परंतु ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊन राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी ३.६ टक्के म्हणजे एकूण योजना काळात १८ टक्के इतकी वाढ साध्य झाली. ही योजना हेरॉल्ड डोमार याच्या प्रतिमानावर आधारित होती.

दिनविशेष

अग्निशमन दिवस

Category:

 

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या ‘एस.एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीला १४ एप्रिल १९४४ रोजी लागलेली आग विझविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. म्हणून १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. तसेच दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनविशेष

जागतिक पुस्तक दिवस

Category:

 

आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे.