दिनविशेष

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन

Category:

 

पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

दिनविशेष

पुण्यातील पहिले चित्रपटगृह ‘आर्यन चित्रमंदिर’

Category:

 

आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणाऱ्या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.

दिनविशेष

पुण्यातील नगरवाचन मंदिराची स्थापना

Category:

 

आचार्य अत्रे हे तर संस्थेचे सदैव हितैषी राहिले. संस्थेबद्दल त्यांनी ८ जानेवारी १९६७ रोजी ‘‘ह्य़ाच संस्थेने माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया घातला. संस्थेचे उपकार मानण्यास मजजवळ शब्द नाहींत. पुण्यातील वाङ्मयप्रेमी तरुणांना स्फूर्ति नि प्रेरणा देण्याचे महान कार्य ह्य़ा संस्थेकडून होवो ही इच्छा!’’ असा अभिप्राय लिहिला आहे.

दिनविशेष

रोझ डे

Category:

 

या आठवडय़ापासून वेलेंटाईन डे पर्यंत विविध मार्गांनी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ भावना व्यक्त करण्यात येतात. जस जसा वेलेंटाइन डे जवळ येतो तसा तरूणाच्या उत्साहाला उधाण येते. विशेषतः रोझ डे पासून तरूणाईकडून आपल्या प्रिय व्यक्तीसाठी विविध भेटवस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली आढळून येते.

दिनविशेष

साने गुरुजी यांचा ‘श्यामची आई’ चित्रपट

Category:

 

श्यामची आई हा चित्रपट मराठीतच नव्हे तर अमराठी रसिकांमध्ये इतका लोकप्रिय आहे की, गेल्या वर्षी मदर्स डे ला आंध्र प्रदेशातील आंध्र ज्योती या वर्तमानपत्राने याचे तेलगु व इंग्रजी सबटायटल करून हा चित्रपट आंध्र प्रदेश येथे सर्वत्र झळकावला. तर पंजाब येथील प्रीती लाहिरी या मासिकेच्या संपादिका पूनम सिंघ यांनीही हा चित्रपट भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या पंजाबच्या खेडय़ांमध्ये झळकावला.

दिनविशेष

दांडी यात्रेचा दिवस

Category:

 

ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला.

दिनविशेष

जागतिक मुद्रणदिन

Category:

 

इसवी सनानंतरच्या दुसऱ्या शतकात चीनी लोकांनी मुद्रणाची पद्धत शोधली. त्या पद्धतीत लागणारी उपकरणे म्हणजे कागद, शाई आणि मुद्रणप्रति मुद्रण प्रतिमा ही कोरून तयार केलेल्या पृष्ठाची असे. त्या काळात काही मजकूर (बौद्ध धर्मातील काही विचार) संगमरवरी (दगडी) खांबावर कोरून ठेवलेले असत.

दिनविशेष

सुनील गावसकर यांच्या कसोटी कारकिर्दीची ५१ वर्षे

Category:

 

६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला.

दिनविशेष

लिज्जत पापड (श्री महिला उद्योग) चा वर्धापनदिन

Category:

 

महाराष्ट्रात, मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडून स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालविलेला उद्योग निर्माण झाला. १५ मार्च १९५९ साली गिरगावमधील सात महिलांनी या उद्योगास जन्माला घातले. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या नावाने आज हा उद्योग जगभर पोहोचला.