व्यक्ती-परिचय

जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी

Category:

 

१९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले.

  June 18, 2022


व्यक्ती-परिचय

कथ्थक नृत्यांगना डॉ. टीना तांबे

Category:

 

टीना तांबे यांनी रंजना ठाकुर, डॉ सुचित्रा हरमलकर, व पंडित रामलाल यांच्या कडून कथ्थकचे शिक्षण घेतले,पुढे २००१ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी गुरु उमा डोगरा यांच्या कडे शिक्षण घेतले. त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई येथून नृत्य अलंकार शिक्षण घेतले आहे, तसेच त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालयतून ‘कथ्थक’ या विषयात एम ए केले आहे.

  June 18, 2022


व्यक्ती-परिचय

सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये

Category:

 

मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत.

  June 18, 2022


व्यक्ती-परिचय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस

Category:

 

गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले.

  June 17, 2022


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे

Category:

 

१९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले.

  June 17, 2022


व्यक्ती-परिचय

स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका इंदुमती पारीख

Category:

 

इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन पारीख यांच्या त्या पत्नी होत.

  June 17, 2022


व्यक्ती-परिचय

मराठी अभिनेते सुनील अभ्यंकर

Category:

 

नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.

  June 17, 2022


व्यक्ती-परिचय

अभिनेते मिलिंद गवळी

Category:

 

शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

  June 17, 2022


व्यक्ती-परिचय

महान गायक नट स्वरराज पं. उदयराज गोडबोले

Category:

 

‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला.

  June 17, 2022