C-संजीव वेलणकर
मराठी चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक अनंत माने
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनंत माने हे पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.
मराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमराठीतले प्रथम भावगीत गायक जी.एन.जोशी यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.
संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.
गायक, संगीतकार राम फाटक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ‘दिसलीस तू’, ‘डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.