लेखसंग्रह

इतिहास आणि आजचे जीवन

Category:

 

खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे.

  February 2, 2022


लेखसंग्रह

नागेश मोरवेकर – एक प्रतिभावान लोककलाकार

Category:

 

डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो.

  February 1, 2022


साहित्य - ललित

जीवनाच्या वाटेवरचे

Category:

 

डीके आजोबा ही वल्ली आमच्या आयुष्यात तशी अचानकच आली. डीके हे त्यांचं आडनाव. त्याचं झालं असं, सूर नवा ध्यास नवा हा बालगायकांचा रिऍलिटी शॊ सुरु होता त्याचं चित्रीकरण मीरा रोड इथल्या स्टुडिओत सुरु होतं. एकदा माझ्या एका परिचितांचा फोन आला की तुम्हाला चित्रीकरण पाहायला जायचं असल्यास डीके आजोबा घेऊन जातील.

  January 31, 2022


साहित्य - ललित

प्रवास शब्दकळेचा

Category:

 

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते

  January 24, 2022


लेखसंग्रह

यश – पचवायचं? की त्यात हरवायचं?

Category:

 

एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी शल्यविशारद, एक यशस्वी राजकारणी, एक यशस्वी खेळाडू , एक यशस्वी लेखक, यशस्वी उद्योजक, यशस्वी अभिनेता, यशस्वी वक्ता अशा अनेकविध क्षेत्रात यशस्वी होऊन काही व्यक्ती नावलौकिकास पात्र होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या क्षेत्रात यशस्वी होऊन जगासमोर येते तेव्हा तिच्या यशाचा बोलबाला होतो, तिच्या अंगी असलेल्या हुनरला अमाप प्रसिद्धी मिळते.

  January 22, 2022


लेखसंग्रह

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

Category:

 

आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात.

  January 16, 2022


साहित्य - ललित

मिमिक्री

Category:

 

र्वी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना अल्प विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा या हेतूने Mimicry कलाकार आपली कला सादर करत असत. पुढे स्वतंत्र Mimicry शोज होऊ लागले. हळुहळु या कलेला स्थिरपणा आला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या नकला , Mimicry यांचे पूर्ण कार्यक्रम सादर करू लागल्या.

  January 14, 2022