लेखसंग्रह

नियंत्रण की मुस्कटदाबी?

Category:

 

शासनव्यवस्था कुठलीही असो, ती कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते किंवा त्या व्यवस्थेच्या सुचारूपणाला कोणताही एकच घटक जबाबदार नसतो. अगदी हुकुमशाही असली तरी हुकुमशहाला सैन्याची, मुलकी अधिकाऱ्यांची मदत घ्यावीच लागते. परस्परांशी संबंधित अशा अनेक घटकांनी मिळूनच कोणतीही शासन व्यवस्था प्रभावीपणे कार्य करू शकते, यशस्वी होऊ शकते. देशात किंवा राज्यात जेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते, तेव्हा दोष त्या व्यवस्थेचा, (मग ती कुठलीही असो) नसतो. त्या व्यवस्थेला संचालित करणाऱ्या एखाद्या प्रभावी घटकाला हानी पोचल्यामुळे, त्याचा सरळ परिणाम व्यवस्थेच्या संचालनावर होऊन अराजक निर्माण झालेले असते.

  November 23, 2003


लेखसंग्रह

कुणा मुखी पडते लोणी…!

Category:

 

भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले. सोबतच आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला समान वागणूक, समान दर्जा आणि समान अधिकार देण्याचे आश्वासन दिलेले आहे. घटनेच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार किंवा घटनेशी बांधीलकी राखूनच देशाचा कारभार चालत असतो, किमान तसे सांगितले तरी जाते.

  September 14, 2003


लेखसंग्रह

केवळ उत्सवप्रियताच!

Category:

 

मनुष्यप्राण्याची आणि त्यातही आपल्या देशातील मनुष्यप्राण्याची काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्यात ‘उत्सवप्रियता’ या वैशिष्ट्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. साजरा करणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या देशातील लोकांनी अगदी नको त्या गोष्टीला नको तितके महत्त्व देऊन उत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे अगदी वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपात साजरी करण्याची बाबसुद्धा सार्वजनिक होऊन गेली आहे.

  September 7, 2003


लेखसंग्रह

दिशाहीन संवेदनशीलता!

Category:

 

आमची संवेदनशीलता अशी दिशाहीन आहे. मनात क्रोध आहे, पण तो नको तिथे व्यक्त होणारा. मनात शांती आहे, परंतु ती सुध्दा नको तिथे आपले अस्तित्व दाखविणारी. मनात उत्साह आहे, पण तो भलतीकडेच ओसंडून वाहतोय. मनात देशभक्ती आहे, पण ती केवळ भक्ती म्हणून उरली आहे. देश कुठेतरी गहाण आहे.

  August 24, 2003


लेखसंग्रह

व्यर्थ शक्तिपात

Category:

 

हिंदू मान्यतेनुसार मनुष्य योनीतला जन्म अतिशय दुलर्भ मानला जातो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटायचे असेल, मोक्ष साधायचा असेल तर तो केवळ मनुष्य जन्मातच साधता येतो. आधीच मनुष्य योनीतला जन्म दुलर्भ आणि त्यातही तो भारतासारख्या देवभूमीत होणे तर अधिकच दुलर्भ.

  August 17, 2003