लेखसंग्रह

तुमचा रिकामा ग्लास कसा भराल?

Category:

 

अशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका.

लेखसंग्रह

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) : एक अप्रतिम शिल्प

Category:

 

बोरीबंदर स्टेशन पाहताना लंडन शहरातील सेंट पॅनक्रॉस रेल्वेस्टेशन सारखा भास होतो. ही भव्य देखणी वास्तू बांधण्यास २.६ लाख पौंड खर्च आला होता, पैकी फ्रेडरिक यांनी आपली फी रुपयांत १८ लाख इतकी स्वीकारली होती. हे स्टेशन जागतिक वास्तुशिल्पांमधील एक जागतिक वारसा (World Heritage Structure) बनून राहिलं आहे. ३६५ दिवस, २४ तास अखंड कार्यरत असणारं हे रेल्वेस्टेशन आहे आणि म्हणून ‘वारसा यादी’त त्याचं महत्त्व

लेखसंग्रह

रेल्वेस्टेशन्स – भारतीय संस्कृतीचं दर्शन

Category:

 

रेल्वेची भराभराट होत गेली, तसतशी रेल्वेमार्गावर स्टेशनच्या रूपात आलेली, पण एके काळची नगण्य असलेली अनेक खेडी उजेडात आली. खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं, तर शहरांची महानगरं बनली. प्रत्येक स्टेशन हे त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि ही स्टेशनं विविध व्यवसायांची केंद्रस्थानंही बनली.

लेखसंग्रह

दुर्ग-मंदिर-तलावांचे शहर – ठाणे

Category:

 

शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत.

अवर्गिकृत

ठाणे जिल्ह्यातील नियतकालिके

Category:

 

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय.

अवर्गिकृत

भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी. के. सिवन

Category:

 

२०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते.

लेखसंग्रह

रेल्वेस्टेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सची बांधणी

Category:

 

विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे.

कथा

हॉटेल मॅनेजर गोमु (गोमुच्या गोष्टी- क्रमांक १७)

Category:

 

गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.