लेखसंग्रह

“बाभळीचे काटे” अचानक चर्चेत

Category:

 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या घुसखोरीमुळे बाभळी धरणाच्या वादाला पुन्हा तोंड फुटले. कोणतेही कारण नसताना हा प्रश्न उकरून काढणे चुकीचे आहे. पण, केवळ राजकीय स्वार्थापोटी नायडूंनी हा नसता उद्योग केला. या प्रश्नाबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कुचकामी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आता या प्रश्नावर राज्यातील जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्यास आश्चर्य वाटायला नको.

लेखसंग्रह

अभिवादन गुरूंना – (गुरूपौर्णिमा विशेष)

Category:

 

‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.

लेखसंग्रह

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

Category:

 

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो.

अवर्गिकृत

माझी ओमानची शैक्षणिक भेट

Category:

 

ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्‍यातील अनुभव लिहिलेले आहेत.

अवर्गिकृत

पालकांनो सावधान…।

Category:

 

रोज नव्या वात्रटिकांसाठी वाचत चला…खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव ब्लॉग…सूर्यकांती

http://suryakantdolase.blogspot.com/ इथे क्लिक करा.

अवर्गिकृत

फक्त लाल किल्लावरून झेंडा फडकवताना काळाबाजार, लाचलुचपतखोर भ्रष्ट्राचारी यांना फासावर देण्याची भाषा करून जय हिंद म्हणतात. !!!

Category:

 

भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर सट्टेबाज काळाबाजार करणारे मोठे व्यापारी उद्योजक यांचे नियंत्रण आहे आणि पक्ष चालवण्यासाठी लागणारा प्रचंड काळा पैसा कांही सामान्य नागरिक किंवा शेतकरी देवू शकत नाही.

लेखसंग्रह

खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका

Category:

 

खासदारांच्या वेतनवाढीच्या मागणीच्या विरोधात जनमताचा रेटा तयार व्हावा, याकरिता पुण्यातील सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. जागरूक नागरिकांनी त्यास पाठींबा देण्याची विनंती केली आहे. आपण ही त्यास पाठींबा द्यावा ही विनंती .