लेखसंग्रह

लाकडी खेळणी बनविणारा कोल्हापूरचा बचत गट

Category:

 

लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत.

अवर्गिकृत

शेतकर्‍यांनी तयार केली पाण्याची बँक

Category:

 

सातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्‍यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.

अवर्गिकृत

पद्मविभूषण पुरस्कार

Category:

 

पद्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.

लेखसंग्रह

“टिनएज” “लव्ह” धोकादायक

Category:

 

पौंगडावस्थेत (टिनऐजर्स) प्रेमाची बाधा झाली नसेल अशी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल. वयाच्या 12 ते 14 वर्षांत प्रेम ही भावना मनात जागृत होऊ लागते. आपल्या आयुष्यातील हे अपघाती वळणच असते. या वयातही हल्ली अनेक अफेअर्स होत आहेत. त्याला ‘टीनएज लव्ह अफेअर्स’ असे म्हणतात. या वयात मुले मागचा-पुढचा कुठलाच विचार करत नाही. कारण ‘लव्ह फिवर’ त्याच्या नसांनसात भिनलेला असतो.

अवर्गिकृत

आंधप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे १० लाखांची देणगी

Category:

 

हैदराबादच्या आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अवर्गिकृत

बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डसमधून मराठी संगीतकार गीतकारांना प्रोत्साहन – अशोक चव्हाण

Category:

 

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एफएम रेडिओवर मराठी गाणी ऐकविली जात असून मराठी संगीतकार, गीतकार यांना प्रोत्साहित करणार्‍या बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डस् सारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अवर्गिकृत

भेंडीचा पिवळा रस्सा

Category:

 

असं म्हणतात की दर चार कोसावर बोलीभाषेत बदल होतो. माझं तर असं निरीक्षण आहे की, दर दहा कोसावर भाजीच्या रस्स्याची चव बदलत असते. अगदी प्रयोग पहायला हरकत नाही. या गावाहून दुसर्‍या गावाला गेलं की रस्सा म्हणजे ग्रेव्हीत बदल होतोच.याचं कारण म्हणजे वापरण्यात येणारे मसाले, फोडणी देण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तयार करणारे हात यांच्यात सतत वेगळेपण असतं.

अवर्गिकृत

इंग्रजी शिकण्याची सोपी पध्दत

Category:

 

कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्‍याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो.

लेखसंग्रह

पहिले चुंबन : अविस्मरणीय क्षण

Category:

 

जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक प्रियकराला आपल्या प्रेयसीचा व प्रेयसीला आपल्या प्रियकराचे पहिले चुंबन घेऊन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण नोंदविण्याची इच्छा असते. परंतु, चुंबन कसे घेणार, या भीतीपोटी संधी येऊनही प्रेमीयुगल चुंबन घेण्याचे धाडस करत नाहीत…