अवर्गिकृत

नवरात्रारंभ

Category:

 

शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.

अवर्गिकृत

वेध संसदीय कार्यपद्धतीचा

Category:

 

भारतीय संसदेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तरीही या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्या-बोलण्यासारखे बरेच काही असते. कदाचित म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचे ‘द पार्लमेन्टरी सिस्टिम’ हे नवे पुस्तक बरेच काही सांगून जाणारे ठरते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. सामान्य माणसाला त्यातून प्रचलित राजकारणाचा नव्याने परिचय होतो.

अवर्गिकृत

काय राव तुम्ही? (वात्रटिका)

Category:

 

काय राव तुम्ही?

नावात काय आहे?

असा शेक्सपियरचा शंख आहे.

मात्र नामांतर नाट्याचा

महाराष्ट्रात नवा अंक आहे.

अवर्गिकृत

महाराष्ट्रात विस्तारतेय अतिरेक्यांचे नेटवर्क

Category:

 

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

लेखसंग्रह

जुन्या प्रश्नाचा निकाल; नव्या प्रश्नांचा जन्म

Category:

 

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेला निर्णय समाधानकारक असला तरी त्याने पक्षकारांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले जाणार आहे. शिवाय ताज्या निकालामुळे भविष्यात नवीन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पण अशा प्रकरणातही राजकीय स्वार्थ साधण्याचा केला जाणारा प्रयत्न दुर्दैवी म्हणावा लागेल.

अवर्गिकृत

विश्वसुंदरीच्या बुद्धिसौंदर्याची चुणूक

Category:

 

लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स २०१०’ स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोच्या जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. ८३ स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. या आधी तिने २००९ मध्ये ‘न्युएस्ट्रा बेलेझा मेक्सिको’ ही स्पर्धा जिकली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.

अवर्गिकृत

भारतभेटीत ओबामा काय साधणार ?

Category:

 

अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नोव्हेंबरमधील नियोजित भारतभेटीची सध्या तयारी सुरू आहे. या भेटीतून भारत-अमेरिका संबंधांना काही नवे वळण लागेल का ? अण्वस्त्र नष्ट करण्याचा कार्यक्रम आखून शांततापूर्ण जगाची उभारणी करण्यात दोन्ही देश पुढाकार घेतील का ? त्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवण्याची दोन्ही नेत्यांची तयारी आहे का ? ओबामा यांच्या भेटीच्या निमित्ताने हे प्रश्न आधी चर्चिले जायला हवेत.