अवर्गिकृत

संस्कृती रक्षण

Category:

 

संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची.

अवर्गिकृत

लेबल

Category:

 

लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात.

अवर्गिकृत

संस्कारित जीवन

Category:

 

भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग दोन

Category:

 

कामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग एक

Category:

 

स्वयंपाक घर म्हटल्यावर खरं तर ते आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत असायला हवं कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचे काम स्वयंपाकघरातच होत असते. प्रत्येक पदार्थाची निर्मिती इथूनच होत असते. तेव्हा सर्व घराबरोबर स्वयंपाक घराची आणि ओट्याची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे.

लेखसंग्रह

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : कर्मवीर भाऊराव पाटील

Category:

 

कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.

अवर्गिकृत

उत्सव की औपचारिकता?

Category:

 

आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात.

अवर्गिकृत

स्त्री प्रतिमा

Category:

 

अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत.