अवर्गिकृत

अपग्रेडेशन

Category:

 

माणसाच्या भाग्यात जसे चढ-उतार असतात ,भरती-ओहोटी असते तसे गाव आणि शहराचेही असावे.नालासोपारा या गावाच्या बाबतीत हे दिसून येते.मुंबई महानगर प्रदेशाच्या सीमेवर पश्चिम रेल्वेच हे एक लोकल स्टेशन. एकेकाळी म्हणजे यादवांच्या वगैरे काळात हे महत्त्वाचे व्यापारी बंदर.

अवर्गिकृत

कोजागरी – कोण जागे आहे?

Category:

 

पोर्णिमा’ ही समस्त जगातील प्रतिभावंतांची आदिम प्रेरणा झाली आहे. त्या एकमेवाद्वीतीय चंद्राच्या शीतल प्रकाशबिंदूंनी जणू प्रतिभेच्या कमळाला फुलण्याची अंतःप्रेरणा मिळते. ते शतदलकमल मग फुलून येतं मनस्वीपणे, चंद्रासारखंच!

अवर्गिकृत

निसर्गरम्य अंदमान

Category:

 

अंदमान म्हटले की सर्वप्रथम सावरकर बंधू , सेल्युलर जेल आणि त्यात असणारे ,भारतातून सर्व राज्यातून आलेले स्वातंत्र्यसैनिक सैनिक आठवतात , स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘ काळे पाणी ‘ आठवते. आणि त्यानंतर आठवतो तो तेथील निसर्ग . खरेच आपण तिथे काय आहे ही नीट पाहिले आहे का ? तिथे मला कुठेही फारसे पोलीस दिसले नाही, आणि आश्चर्य म्हणजे एकही स्कूटर किवा बाईक चालवणारा हेल्मेटशिवाय दिसला नाही. तर कोपऱ्यावर चिट्ठी फाडणारा पोलीस किवा घासाघीस करणारा माणूस सापडला नाही.

अवर्गिकृत

कॅाफीपुराण

Category:

 

मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची!

अवर्गिकृत

तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?

Category:

 

आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला. सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते… नेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते. साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या, कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते कारण तो मुरलेला साहेब होता ना.

लेखसंग्रह

दिवाळी आणि रांगोळी…

Category:

 

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली .

अवर्गिकृत

माहेर

Category:

 

कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा.

अवर्गिकृत

संस्कारांच्या भिंती

Category:

 

कथा म्हटलं की त्यात ‘नायक’ आला आणि ‘नायक’ नेहमी शुर,पराक्रमी वगैरे असायचाच. मग तो परंपरागत महाकाव्यांचा नायक असू दे किंवा आजच्या चित्रपटांचा ! मात्र या दोन्ही नायकांमध्ये बराच फरक असतो. आपल्या प्राचीन महाकाव्यांचे नायक हे अन्यायाविरुद्ध लढणारे असायचे. त्या त्या काळातल्या आसुरी शक्तींविरुद्ध त्यांनी हातात शस्त्रही घेतलं. पण लढणं आणि मारणं एवढाच त्यांच्या शौर्याचा निकष नाही.

अवर्गिकृत

विवाह संस्था

Category:

 

उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते.

अवर्गिकृत

उपनयन विधी

Category:

 

नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई