अवर्गिकृत

वेधशाळा

Category:

 

काही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे, यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा.

अवर्गिकृत

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

Category:

 

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

अवर्गिकृत

बॉम्बस्फोट आणि राजकारण

Category:

 

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.

अवर्गिकृत

युसूफ मेहेर अली सेंटर – तारा

Category:

 

युसूफ मेहेर अली हे स्वातंत्र्यपूर्व भारतात इंग्रजाच्या जुलूमी रावटीविरोधात कामगारांना व शेतकर्‍यांना संघटित करुन त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे प्रखर व तेजस्वी सेनानी होते. त्यांच्या बाणेदार व तडफदार स्वभावाचा वारसा पुढे चालवत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पनवेलमधील तारा या निसर्गरम्य गावी युसूफ मेहेर अली सेंटर सुरु करण्यात आले व काही वर्षांमध्येच या सेंटरने स्वच्छ प्रतिमा व समाजवादी तत्वांच्या बळावर स्वतःचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला.