अवर्गिकृत

मॉर्निंग वॉक

Category:

 

उठा उठा, एक जानेवारी जवळ आली, नवीन resolution करण्याची वेळ झाली! म्हणजे मी तरी निदान एक तारखेला नवीन resolution करते. शास्त्र असतय ते! आणि ते दोन तारखेला मोडते. पण नवीन resolution करण्यात पण एक गंमत असते. आता त्यातही एवढे जास्त प्रकार आहेत की “मोडायचच आहे तर चला, जरा कठीण resolution करू “

अवर्गिकृत

आणि माझं सायकलीचं वेड

Category:

 

काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते.

लेखसंग्रह

आजींच पुस्तकांच हॉटेल

Category:

 

जगामध्ये छंद वेड्या लोकांची काही कमी नाही, जन्माला येणारी व्येक्ती काहीना काही छंद घेऊन येत असते आणि काही छंद तर आश्चर्य वाटेणारे असतात.त्यांचा छंद,त्यांची आवड लोकांच लक्षवेधुन घेत असते,त्यांचा छंद चर्चेचा विषय ठरतो.म्हणून माणसाला काहीना काही चांगला छंद असावा जेणेकरून आपण केलेल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.माणसाच काम आणि कर्तृत्व लक्षवेधी असेल तर त्यांच्या कामाची दखल निश्चित घेतली जाते.

लेखसंग्रह

सुट्टी पे सुट्टी… !

Category:

 

सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा..

अवर्गिकृत

उपवास

Category:

 

हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते.

लेखसंग्रह

स्वीडनमध्ये वही-पेन चा वापर

Category:

 

स्वीडनमध्ये आता लोकांना टॅब्लेट, संगणक आदी तांत्रिक, डिजिटल उपकरणांचा कंटाळा आल्यामुळे मुलांचे डिजिटल शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. या ऐवजी आता पुन्हा वही व पेन म्हणजे लिहिण्याला प्रोत्साहन देण्याची याच शैक्षणिक सत्रापासून सुरुवात झाली आहे.

लेखसंग्रह

झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

Category:

 

जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले.

अवर्गिकृत

निसर्ग आणि आपण

Category:

 

संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात.

लेखसंग्रह

चाळीतली दिवाळी

Category:

 

दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्‍यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच.

अवर्गिकृत

दूरदर्शन

Category:

 

टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला.