कथा

आर्यावर्तातील प्राणत्यागी विहंग 

Category:

 

अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .

कथा

धौम्य व उपमन्यू

Category:

 

फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत. कामे करीत असताना त्यांना आपोआपच व्यवहारज्ञानही प्राप्त होई; आणि त्यांची शरीरे सुदृढ बनत. धौम्य ऋषींच्या आश्रमातील सर्व शिष्यांत उपमन्यू, वेद आणि आरुणी हे तीन अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक शिष्य गुरुजींचे फार आवडते होते.

कथा

गुरुदक्षिणा

Category:

 

प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.

कथा

गोष्टी सांगेन युक्तांच्या चार

Category:

 

पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला. उपप्लव्य नावाच्या एका नगरामध्ये ते उघडपणे वास करू लागले. कृष्ण आणि बलराम द्वारकेहून तेथे आले. मित्रमंडळ व आप्तेष्ट आले. या सर्वांच्या उपस्थितीत अर्जुनपुत्र अभिमन्यूचे विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी मोठ्या थाटात लग्न पार पडले.

कथा

अन्नपूर्णा देवीची गोष्ट

Category:

 

फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता. ‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या. या देवी-देवतांमध्ये ‘इजानागि’ आणि ‘इजानामि’ या दोन देवी देवतांचाही समावेश होता.

लेखसंग्रह

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती (गीत  गणेश)

Category:

 

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली.

कथा

इमाम आणि देवदूत

Category:

 

शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.

कथा

आदित्यराणूबाई

Category:

 

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.

लेखसंग्रह

एशियन पेंटस्

Category:

 

भे’ट देणे’ म्हणजे आपण कुठल्या तरी स्थळाला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला भेटायला जाणे असा एक अर्थ आहे आणि ‘भेट देणे’ म्हणजे आपण कुणाला तरी वस्तूरूपाने, पैशाच्या रूपाने वा इतर दृष्टीने काहीतरी ‘नजराणा’ ‘म्हणजे ‘भेट’ देतो. ही ‘भेट’ देण्यासाठी काहीतरी प्रयोजन असते. कारण असते. एखादा सण उत्सव आणि उल्लेखनीय दिवस… काहीही असते.