व्यक्ती-परिचय

राजकुमार – विवादाच्या स्टेटमेंटमध्ये अडकलेला सशक्त अभिनेता

Category:

 

राजकुमार हा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता होता. त्यामुळे त्याचा अभिनय दुर्लक्षित राहीला. लक्षात राहिले त्याची इतरंबद्दल केलेली विधाने.

कथा

बकासुराची गोष्ट

Category:

 

कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत.

कथा

लंकादहन

Category:

 

रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले.

कथा

पोप आणि नोकर

Category:

 

अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.

कथा

होळीविषयी लोककथा

Category:

 

गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात.

कथा

कहाणी आकाशदिव्यांची

Category:

 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे. पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.

कथा

पुरुषार्थ

Category:

 

एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.

कथा

सर्वात वाईट वस्तू

Category:

 

एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.