अवर्गिकृत

गाण्याच्या कहाण्या – ‘पिया ऐसो जीयामे समाय गयो’

Category:

 

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ,गुरु दत्तचा ‘साहब ,बीबी और गुलाम ‘हा सिनेमा वगळून लिहता येणार नाही. त्या वेळीस ,म्हणजे मी तसा पक्का सिनेमबाज नव्हतो म्हणा, आणि वय हि बालिशच होत ,संधी असून हि मी तो पाहायचा टाळला होता. कारण काय?तर त्यात मीनाकुमारी होती ! ‘एक रडकी हिरॉईन ‘ हा त्या वेळेसचा ग्रह बरेच दिवस तसाच होता.

लेखसंग्रह

पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’

Category:

 

राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय.

कानडी दंडेली
लेखसंग्रह

कानडी दंडेली

Category:

 

गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे.

अवर्गिकृत

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

Category:

 

या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू.