अवर्गिकृत

मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

Category:

 

आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले

लेखसंग्रह

बेभान झुंडींचे बळी

Category:

 

प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

अवर्गिकृत

नो टीव्ही होम !

Category:

 

मला एक नेहमी वाटतं आपण मराठी माणसं सकाळी घरामध्ये छान संगीत लावतो. अभंग लावतो. उत्तम स्वरांनी वातावरण पवित्र करतो. तेच आपण संध्याकाळी टीव्ही सिरीयल, सो कॉल्ड टीपेच्या आवाजातल्या बहुतांशी बिन बुडाच्या ईशू वरील चर्चा मधून भांडणाचे, द्वेषाचे विषारी स्वर घरात आणतो.

अवर्गिकृत

माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ! ( बेवड्याची डायरी – भाग २२ वा )

Category:

 

..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !

साहित्य - ललित

आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम !

Category:

 

नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे.

कोरोना ‘चक्रव्यूह’
लेखसंग्रह

कोरोना ‘चक्रव्यूह’

Category:

 

कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय.

अवर्गिकृत

डोक्याला खुराक …डायरी रायटिंग ( बेवड्याची डायरी – भाग २१ वा )

Category:

 

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता

साहित्य - ललित

चुकलेला अंदाज!

Category:

 

जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

लेखसंग्रह

लढा

Category:

 

एका अथांग विश्वातल्या एका आकाशगंगेतल्या एका सूर्यमालेतल्या एका ग्रहावरच्या, कोट्यावधी सजीवांमधील एक प्रजाती म्हणजे ‘माणूस’. उत्क्रांतीत लाभलेल्या मेंदूचा वापर करीत प्रगतीचा वेग वाढवत नेला या मानव समुहाने. थोड्याच काळात बौध्दिक व भौतिक पातळीच्या सीमा गाठण्याच्या वल्गना हा समूह करू लागला. Nature आणि Nurture या दोन्हींचा समतोल राखण्याचे भान तो या घोडदौडीत विसरला. ‘Nature काय? किस झाडकी पत्ती’ ही प्रवृत्ती वाढत गेली.

लेखसंग्रह

धोक्याची घंटा !

Category:

 

सुजान बंधू-भगिनींनो, परिस्थितीचं गांभिर्य ओळखा. विनाशाची वेळ नजीक आली आहे. आता जर आपण सावध झालो नाही तर तर मग पुढे जे होईल त्याला दैव देखील अडवू शकणार नाही…अनंत पीडा आणि असह्य्य वेदनांचा एक भयानक प्रवास ज्यामध्ये मृत्यूचं असं तांडव खेळल्या जाईल की याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही.