लेखसंग्रह

स्वतः जळून उब देता आली पाहिजे !

Category:

 

आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.

काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.

  March 22, 2011


अवर्गिकृत

कुटील अमेरिका व दोस्त राष्ट्रांचे स्वार्थी हल्ले

Category:

 

अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.

भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

  March 22, 2011


लेखसंग्रह

आठवणीतील क्षण

Category:

 

माझी पावले यंत्रवत झपाझप चालत होती, मात्र बघितलेल्या चित्राने मनात काहूर माजलेले होते. हरीणावरील अनपेक्षित हल्ल्याचा प्रसंग कसा असेल ? हृदयाचे तुकडे करून टाकणाऱ्या प्रसंगांनी किती हरीणांचे दररोज मुडदे पडले जात असतील ? हा प्रश्नच मला अतर्क्य वाटतो …….

  March 21, 2011


लेखसंग्रह

अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

Category:

 

भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.

  March 17, 2011


अवर्गिकृत

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अत्यावश्यक आहे.

Category:

 

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे.लोकशाहीत लोकांच्या मताला महत्व आहे,पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मुल्यांचा लोप होत आहे.लोकशाहीला बळकट व प्रभावशाली करण्यासाठी काही महत्वपूर्ण बदलांची गरज आहे.भारतातील आजची परीस्थीती पाहता सर्वप्रथम निवडणूक प्रकियेत तसेच लोकांच्या मतदान अधिकारात काही क्रांतिकारी बदल करणे आवश्यक आहे.

  March 8, 2011