“कशी कळेना प्रीत तुला…?”

प्रेमरंग उधळूनी

प्रेमालींगण देऊनी

दाखव मला, हिरवी फीत

तुला कशी ……………….!



कशी कळेना प्रीत तुला…?

उपचाराचे बोलणे चालणे
उपचाराची रीत
तुला कशी कळेना प्रीत माझी
प्रिये कशी कळे ना प्रीत.. ? ||धृ ||

जवळ तुझ्या घुटमळणे
तुझ्याचसाठी तळमळणे
चोरुनी बघणे, जगास भीत
तुला कशी ………….. ||१ ||

तुझ्या प्रीतीचा भूकेला
प्रेमासाठी आसुसलेला
मुखी माझ्या, तुझेच गीत
तुला कशी …………… ||२ ||

नयनी माझ्या बसलीस
तूच सखे मनीं ठसलीस
हृदयीं स्वप्न, तुझेच गीत
तुला कशी ………….. ||3 ||

तुलाच पाहणे
स्वप्नात राहणे
प्रीतीचे कसे हे, एकसूरी संगीत
तुला कशी ……………….. || ४ ||

प्रेमरंग उधळूनी
प्रेमालींगण देऊनी
दाखव मला, हिरवी फीत
तुला कशी ……………….! || ५ ||

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →