लेखसंग्रह

स्मार्टफोन

Category:

 

सेलफोन हा केवळ बोलण्यासाठी कामाचा होता, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा होत्या. त्यातूनच हातात मोबाईलसारखेच यंत्र असेल पण त्यावर ईमेल, फोन कॉल्स, घड्याळ, नोट पॅड अशा अनेक सुविधा देता आल्या तर बरे होईल, या विचारातून स्मार्टफोन ही संकल्पना पुढे आली.

  September 14, 2023


लेखसंग्रह

आयफोन

Category:

 

आयफोन हा स्मार्टफोनचा एक प्रकार आहे. त्यात आयपॉड व सेलफोन या दोन्हींचा समावेश असतो. पहिला आयफोन अॅपल कंपनीचे प्रमुख स्टीव्ह जॉब्ज यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत तयार केला.

  September 13, 2023


लेखसंग्रह

मोबाईल (सेलफोन)

Category:

 

मोबाईल फोन म्हणजे सेलफोन. यात मोबाईल हे नाव अशासाठी की, आपण कुठेही असलो तरी मोबाईलवर बोलू शकतो म्हणून आणि सेलफोन अशासाठी की, मोबाईल फोनच्या कार्यासाठी कुठल्याही महानगराचे काही विभाग पाडतात त्यांना सेल म्हणतात.

  September 12, 2023


लेखसंग्रह

थ्री जी तंत्रज्ञान

Category:

 

सेलफोन म्हणजे मोबाईलमध्ये तंत्रज्ञानाची जी स्थित्यंतरे आली त्यात थ्री-जी तंत्रज्ञान हे एक आहे. थ्री-जी याचा अर्थ थर्ड जनरेशन असा आहे. थोडक्यात मोबाईल ज्याच्या आधारे चालतो त्या तंत्रज्ञानाची तिसरी आवृत्ती सध्या भारतात वापरली जात आहे.

  September 10, 2023


लेखसंग्रह

इनव्हर्टर

Category:

 

आजच्या लोडशेडिंगच्या जमान्यात इनव्हर्टर हे यंत्र सर्वांना परिचयाचे झाले आहे. ‘… इनव्हर्टर असेल तर सारं चालेल निश्चिंतपणे’ ही जाहिरातही आपण पाहतो आहोतच, वीज नसली तर आपली घरातील सर्व उपकरणे बंद पडतात, पण इनव्हर्टरमुळे आपण ती वीज नसतानाही काही काळासाठी चालवू शकतो अगदी संगणकासोबत आपण जो यूपीएस वापरतो तो इनव्हर्टरचाच प्रकार असतो, त्याला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय असे म्हणतात.

  September 9, 2023


लेखसंग्रह

ब्लू रे डिस्क

Category:

 

सीडी व डीव्हीडी यांच्यापेक्षाही अधिक सरस असे तंत्रज्ञान असलेल्या ब्लू रे डिस्कचा जन्म अलीकडच्या काळातील आहे. डीव्हीडीनंतर विकसित झालेले हे तंत्रज्ञान आहे. ब्लू रे डिस्कला बीडी असे संक्षिप्त नाव आहे. डीव्हीडीप्रमाणेच ही ऑप्टिकल डिस्क असून सीडी व डीव्हीडी या दोन्हीतील कमतरता यात भरून काढल्या आहेत.

  September 8, 2023


लेखसंग्रह

ग्राफिक कार्ड

Category:

 

अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.

  September 7, 2023


लेखसंग्रह

ब्लूटूथ तंत्रज्ञान

Category:

 

ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते.

  September 6, 2023


लेखसंग्रह

हार्ड डिस्क

Category:

 

पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही.

  September 5, 2023