लेखसंग्रह

भोपाळ दुर्घटना

Category:

 

दोन डिसेंबर, १९८४ च्या मध्यरात्री मध्य. प्रदेशातील भोपाळ येथील ‘युनियन कार्बाइड’च्या मेथिल कारखान्यात आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात असे समजले गेले.

  February 20, 2023


लेखसंग्रह

मोटार चालवणारे आम्ल !

Category:

 

मोटारकारमधील विद्युत उपकरणे चालवण्यासाठी विद्युतधारा कोठून मिळते? मोटारकारमध्ये एक विद्युतघट (बॅटरी) असतो. त्यातून मिळणाऱ्या विद्युतधारेमुळे मोटारकार सुरू होते आणि इतर विद्युत उपकरणेही चालतात. मोटारकारमधील विद्युतघटात सल्फ्युरिक आम्ल असते. त्यात शिसे (लेड) या धातूच्या पट्ट्या अर्धवट बुडालेल्या स्थितीत उभ्या असतात. दोन्हींच्या अभिक्रियेतून विद्युतधारा निर्माण होते. यामुळेच या विद्युतघटाला ‘लेड ॲसिड बॅटरी’ आणि सल्फ्युरिक आम्लास ‘बॅटरी ॲसिड’ या नावांनी ओळखले जाते.

  February 19, 2023


लेखसंग्रह

वायुगळती

Category:

 

२००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट ” थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला लागले, घशापाशी जळजळ झाली. बरेच दिवस तेथील प्रदूषणं-नियंत्रकांना हा उपद्रव नेहमीप्रमाणे मोटारकारच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होतोय असे वाटले.

  February 18, 2023


लेखसंग्रह

कागदासाठीचा लगदा

Category:

 

पाण्यात वेगवेगळे पदार्थ मिसळून मऊसर, ओलसर तयार केलेला पदार्थ म्हणजे ‘लगदा’ होय. कागद तयार करण्याच्या पद्धतीत लगदा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लगदा हा मुख्यतः तीन प्रकारचा असतो.

  February 17, 2023


लेखसंग्रह

केरोसिन इंधन

Category:

 

ही १८६० सुमारातील गोष्ट आहे. त्या वेळी, पेट्रोलियम खनिज तेलाचा शोध’ नुकताच लागला, होता. पण, माणसाला त्याचा फारसा उपयोग नव्हता. तेव्हा युरोपमध्ये लोक प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यामध्ये व्हेल माशाचे तेल वापरीत. ते खूप खर्चिक असे. त्याच वेळी खनिजतेलातून केरोसिन म्हणजे घासलेट तेलाचे उत्पादन सुरू झाले. अगदी दुसऱ्या वर्षापासून त्याची जगात इतरत्र निर्यात सुरू झाली.

  February 16, 2023


लेखसंग्रह

ग्रीज आणि भेद्यक्षमता

Category:

 

फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उर्ध्वपातनानेn मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय.

  February 15, 2023


लेखसंग्रह

शीतलक व ब्रेकतेले.

Category:

 

एका पेट्रोलियम कंपनीच्या गोदामाला अचानक आग लागली. सुरक्षेच्या दृष्टीने कर्तव्यतत्पर असलेल्या तिथल्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण कळेना. त्या दुर्घटनेची ‘रुट कॉज अॅनालिसिस’ करण्यात आली. अखेरीस त्यांना ते कारण सापडले. त्या गोदामात पोटॅशियम परमॅग्नेट या रसायनाच्या गोणी साठवून ठेवल्या होत्या. त्याच्याच बाजूला असलेल्या दुसऱ्या कक्षात शीतलकाची पिंपे उभी केलेली होती. शीतलक हे मुख्यतः एथिलिन ग्लायकोल या रसायनाने बनलेले असते. जमिनीवर ठेवलेल्या एका पिंपातून शीतलकाची गळती झाली होती.

  February 14, 2023


लेखसंग्रह

व्हाइट स्पिरिट

Category:

 

मिनरल टर्पेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते. रंग, वार्निश, लेकर्स यांचे पृष्ठीय थर (सरफेस कोटिंग) देण्यासाठी हे द्रावण मोठ्या प्रमाणात वापरतात. या द्रावणात असलेल्या एरोमेटिक हायड्रोकार्बन्सच्या अंशामुळे त्याची द्रावणीयता वाढीव स्वरूपाची असते. त्याची ही द्रावणीयता व हळुवार उडून जाण्याची क्षमता यांच्या समतोलपणामुळे समप्रमाणात कोटिंग करताना खूप फायदा होतो.

  February 13, 2023


लेखसंग्रह

सुरुवातीचे प्लास्टिक – कचकडे

Category:

 

१९५० पर्यंत घराघरात तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. पितळेच्या भांड्यात ठेवलेल्या आंबट पदार्थांची चव बदलते त्याला कळकणे म्हणतात. त्यासाठी ‘भांड्यांना आतून कल्हई केली जाई. कल्हई करणे म्हणजे कथलाचा (टिन) मुलामा देणे. १९५० च्या सुमारास बाजारात स्टेनलेस स्टीलची भांडी नुकतीच डोकावू लागली होती. साधारण त्याच सुमारास बाजारात प्रथम कचकड्याच्या वस्तू दिसू लागल्या. या वस्तू टेबलावरून खाली जमिनीवर पडल्या तर पिचत किंवा फुटत. कचकड्याच्या निमित्ताने प्लास्टिकची ही पहिली ओळख भारतीय समाजाला झाली.

  February 12, 2023


लेखसंग्रह

प्लास्टिकचा इतिहास भाग-२

Category:

 

१९५२ साली प्रा. झिग्लर यांनी बनवलेल्या पॉलिथिलीनमध्ये ॲलिम्युनिअम ट्रायअल्कील व टीटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवलेला साहाय्यक पदार्थ प्रक्रियेसाठी वापरला होता. नंतर प्रा. नाटा या इटालियन शास्त्रज्ञाने हा साहाय्यक पदार्थ बदलून त्याऐवजी प्रोपिलीन वापरले. त्यामुळे पॉलिथिलीन अधिक मजबूत बनले. १९५६ मध्ये पॉलिअॅसिटलचा आणि १९५७ साली पॉलिकार्बोनेटचा उदय झाला.

  February 11, 2023