लेखसंग्रह

काळे सोने’

Category:

 

पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली.

  March 2, 2023


लेखसंग्रह

बिनशिशाचे पेट्रोल

Category:

 

मुळात, पेट्रोल रंगहीन असते व पाण्यासारखे दिसते. पण अन्य पेट्रोलियम पदार्थांपासून त्याची सहज ओळख पटावी म्हणून त्यात नारिंगी रंग मिसळला जातो. उच्च ज्वलनक्षमतेच्या पेट्रोलला लाल रंग दिला जातो, तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पेट्रोलला निळा रंग असतो.

  March 1, 2023


लेखसंग्रह

कठीण पाणी आणि कागद

Category:

 

विहीर, ओहोळ, नदी, झरे ही पाण्याची महत्त्वाची उगमस्थाने होत. या प्रत्येक उगमस्थानातील पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. कठीण, मृदू, खनिजयुक्त पाणी हे पाण्याचे काही रासायनिक गुणधर्म आहेत. पाण्यात साबणाला कमी फेस नाही तर ‘कठीण पाणी’ आणि भरपूर फेस आला तर ‘मृदू पाणी’ होय.

  February 28, 2023


लेखसंग्रह

डिझेल व पेट्रोलमधील फरक

Category:

 

डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.

  February 27, 2023


लेखसंग्रह

उच्च प्रतीचा कागद

Category:

 

रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात.

  February 26, 2023


लेखसंग्रह

कागदातील तंतू

Category:

 

गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे कागद तयार करण्यासाठी लागणारे मुख्य पदार्थ हे तंतुमय असतात. कागद म्हणजे तंतुमय पदार्थांची चटई. कागद तयार करताना तंतूंची भूमिका फार महत्त्वाची असते. गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोजमुळे वनस्पती जमिनीवर ताठपणे उभ्या राहू शकतात.

  February 25, 2023


लेखसंग्रह

नैसर्गिक वायू

Category:

 

नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठ्या प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नैसर्गिक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात

  February 24, 2023


लेखसंग्रह

नॅफ्था

Category:

 

नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊर्ध्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅपशॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश नॅपथा’ असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ असे (एल.ए.एन.) संबोधिले जाते.

  February 23, 2023


लेखसंग्रह

हवेतील नायट्रोजन ऑक्साइड

Category:

 

मुंबईच्या हवेत कोणकोणते त्रासदायक घटक आहेत याची जंत्री करणे मोठे जटिल काम आहे. १९९६ साली जपानमधील नागोया गावी एक परिषद झाली. तेथे अमेरिकेच्या हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने मुंबईच्या हवेत असलेल्या नायट्रोजन ऑक्साइडच्या जास्तीच्या प्रमाणाबद्दलचा निबंध वाचला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे हे जास्तीचे प्रमाण असण्यात मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो.

  February 22, 2023


लेखसंग्रह

सोडायुक्त पेय का फसफसते?

Category:

 

कोणतेही सोडायुक्त सॉफ्ट ड्रिंक फसफसते, ते का? कार्बन डाय ऑक्साइड वायू पाण्यात विरघळतो, तेव्हा त्या द्रावणाला कार्बोनिक आम्ल म्हणतात. खरं तर अशा द्रावणात कार्बोनिक आम्ल थोड्याच प्रमाणात असते. आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डाय ऑक्साइड वायू शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेतही कार्बोनिक आम्ल तयार होते. अंतराळात घन स्वरूपातील पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्यावर वैश्विक आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे कार्बोनिक आम्ल तयार होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

  February 21, 2023