No Picture
लेखसंग्रह

प्लास्टिकचा इतिहास – भाग १

Category:

 

मायकेल फेरेडेने असे निरीक्षण केले की, गुट्टा पर्चा चीक (मलाया द्विपकल्पामधील पर्चा नावाच्या झाडापासून मिळणारे चीक/रबर) उत्तम विद्युतरोधक असतो व त्यावर पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे ट्रान्स अटलांटिक केबलवर पर्चाच्या झाडाच्या चिकाचे आवरण दिले गेले. आजही हे आवरण समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या केबलवर देतात. पर्चा झाडाचा चीक हा एक प्लास्टिकसदृश पदार्थ होता.

No Picture
लेखसंग्रह

आपलं रसायनशास्त्र

Category:

 

लोकसत्ता’मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली अनेक वर्षे सदर चालवलं जातंय! विज्ञानाच्या अनेकविध अंगांविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक कुतूहलं निर्माण होत असतात. या सदरातून ही कुतूहलं शमवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील अनेक वैज्ञानिक विषय हाताळले गेले आहेत.

No Picture
लेखसंग्रह

नळ का गळतो आणि कसा थांबवायचा?

Category:

 

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो.

No Picture
लेखसंग्रह

प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

Category:

 

घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे

No Picture
लेखसंग्रह

काँक्रीटचे बांधकाम निकृष्ट व असुरक्षित असल्यास कोणते उपाय योजले जातात?

Category:

 

मजबुतीच्या सर्व तपासण्या झाल्यावर बांधकामाची भारक्षमता मूळ अपेक्षित पातळीपेक्षा कमी झाली असेल, तर त्याच्या प्रमाणानुसार उपाययोजना खालीलप्रमाणे करावी लागते.

No Picture
लेखसंग्रह

इमारतीवरील पाण्याच्या टाकीबाबत खबरदारी

Category:

 

मारतीवरील टाक्यांचे निरनिराळे प्रकार आहेत. ते कोणते हे पाहून त्यांचे कार्य योग्य रीतीने व्हावे म्हणून खालील खबरदारी घ्यावी.

No Picture
लेखसंग्रह

बांधकामाच्या वेळी घ्यावयाची काळजी

Category:

 

आराखड्याप्रमाणे व्यास, परिमाणांसह सलोह काँक्रीट होत आहे की नाही हे बघणे पर्यवेक्षकावर बंधनकारक असते. सलोह काँक्रीट हे नुसत्या काँक्रीटपेक्षा अनेकपटीने मजबूत असते. प्रचंड वादळे, भूकंप यांना तोंड देऊ शकते. त्याचा वापर +५० ते -४० अंश सेल्सियस या तापमानात करता येतो. मात्र खांब, तुळया, स्लॅब याला तडे जाऊन सळ्या उघड्या पडल्यावर त्या गंजतात. त्यामुळे अशा वेळी फटी मोठ्या करून त्यावर रसायनाचा लेप देऊन त्या परत काँक्रीटने बंद कराव्यात.

No Picture
लेखसंग्रह

सलोह काँक्रीटचा बांधकामातील उपयोग

Category:

 

ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन करायची ताकद चांगली आहे, पण ताण सहन करायची ताकद नाही.

No Picture
लेखसंग्रह

जुन्या इमारती शतकानुशतके कशा टिकल्या?

Category:

 

सी मेंटचा शोध लागण्यापूर्वी बांधकामात इतर पदार्थांचा वापर होत असे. चुन्याचा शोध फार प्राचीन काळीच लागला होता, कारण उत्तर भारतात चुनखडीचे खडक अस्तित्वात होते व आहेत. हे पांढरे खडक इतर खडकांच्या तुलनेत खूपच ठिसूळ व छिद्रमय असतात. ते फोडणे सहज शक्य होते.

No Picture
लेखसंग्रह

भूकंपरोधक बांधकामासाठी बीआयएस कोड १८९३ मध्ये काय सांगितले आहे?

Category:

 

भूकंपासाठीची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी उपलब्ध आहेत. ही तत्वे तयार करताना सर्वप्रथम इतिहासात झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार भूकंप-प्रवण क्षेत्र ठरवले जाते. कुठल्या भागात भूकंपाची किती शक्यता आहे ते ठरवले जाते, जसे कमी शक्यता, मध्यम शक्यता आणि सगळ्यात जास्त शक्यता अशी.