खाद्ययात्रा

काष्टा सोडून वैश्वदेव

Category:

 

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना! ‘सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ सूनबाई त्या काळातल्या होत्या.खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या. दरवर्षी हीच सूचना!

  May 5, 2017