कथा

धौम्य व उपमन्यू

Category:

 

फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.

कथा

गुरुदक्षिणा

Category:

 

प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.

कथा

गोष्टी सांगेन युक्तांच्या चार

Category:

 

पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला.

कथा

चित्रकाराचे चातुर्य

Category:

 

एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत.

कथा

अन्नपूर्णा देवीची गोष्ट

Category:

 

(जपानची पुराणकथा)

फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.

कथा

हान्या महाराज

Category:

 

खानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता.

कथा

वशिष्ठ विश्वामित्रांची गोष्ट

Category:

 

राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.

कथा

पृथ्वीवर अवतरली चंद्रिका

Category:

 

(जपानी लोककथा)

तशी ही जुनीच गोष्ट आहे. जपानमधल्या बांबुबनातली आहे. एक गरीब म्हातारा नित्यनेमाने बांबूबनात यायचा. तिथून बांबूची रोपे जमा करायचा. रोपे विकून आपली उपजीविका करायचा. एके दिवशी धारदार कोयता घेऊन म्हातारा बांबूबनात गेला होता. त्याने कोयत्याने एक बांबूची फांदी कापली. त्याबरोबर बांबूच्या पोकळीतून चंद्रकिरणासारखी प्रकाशाची रेषा बाहेर आली.

कथा

वरुणपुत्र भृगची गोष्ट

Category:

 

वृक्षतोड हेच महान पाप आहे असे सांगणारी एक कथा ‘शतपथ ब्राह्मणात’ आली आहे. भृगुऋषी हा वरुणाचा मुलगा होता. त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की, वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असे त्याला वाटू लागले.

कथा

साळींदरची प्रकाशभेट

Category:

 

(सायबेरियन लोककथा )

कोण्या एके काळी सायबेरियन लोकांना साळींदर हा प्राणी फार आवडायचा. कुठल्याही प्रश्नाचे चटकन् उत्तर शोधणारा हुशार व चाणाक्ष प्राणी म्हणून साळींदरची ओळख होती. साळींदर दयाळू स्वभावाचा होता. कुणाच्याही मदतीला चटकन् पुढे यायचा. सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायचा. त्यामुळे सर्वांना तो हवा हवासा वाटायचा. तो सायबेरियन शेतकऱ्यांचा जिवाभावाचा दोस्त होताच; पण तितकाच तो आकाशाचाही मित्र होता.