कथा

इम्युनिटी अनलिमिटेड

Category:

 

” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव .

  February 4, 2026


कथा

नक्षत्रांची वेल

Category:

 

नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली .
बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .

  February 4, 2026


प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !
कथा

प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

Category:

 

एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल .

  February 4, 2026


कथा

मानसकोंड-मासा

Category:

 

त्यांना मदत करणाऱ्या वाहन चालकांना हे ठाऊक नव्हतं , की हाही एक धंदा आहे . कारण ते पाणी पैसे देऊन निघून जात होते .
मनातून सुखावत होते . आपण माणुसकी दाखवली या आनंदात ते जात होते . लोकांच्या भावनेचा धंदा करता येतो आणि लोक फसत राहतात , हे पुन्हा पुन्हा जाणवत होतं .

  February 4, 2026


कथा

मानसकोंड – शापवाणी

Category:

 

मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .

  February 4, 2026


कथा

मानसकोंड – पडझड

Category:

 

आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
तसा तो मनकवडाच होता .

  February 4, 2026


कथा

भिंतीवरचा तिचा फोटो 

Category:

 

हे सगळं लिहिताना अंगावर काटा उभा राहतोय .
भयावह पोकळी निर्माण होतेय मनात .
वाटतंय काहीच लिहू नये .
पण…
संवेदनशील मन स्वस्थ बसू देत नाही.
हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला , हे माहीत नाही .
– डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य …
– तोच चेहरा …तेच घाव…

  February 4, 2026


कथा

बेभान

Category:

 

जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा …

  February 4, 2026


कथा

डोंगरातला झरा

Category:

 

“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या .

  February 4, 2026


कथा

तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची

Category:

 

गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.

  February 4, 2026