डॉ. नॉर्मन शुमवे
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहपहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड अशी त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्यापूर्वी देखील त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केली. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्यतेच्या आवाक्यात आणली. या शस्त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले.
Category:
लेखसंग्रहलहान मुलांमध्ये जन्मतः असलेल्या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्फ्रेड ब्लॅलॉक विसाव्या शतकातील अग्रगण्य शल्यविशारद होते. शल्यचिकित्सेतील भरीव कामगिरीसाठी कित्येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. १९५० सालापर्यंत ब्लॅलॉकनी जन्मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्या एक हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या.
Category:
लेखसंग्रहडॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद होते. त्यांनी श्वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपण तर केलेच पण एका श्वानमस्तकाचे प्रत्यारोपणही केले. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्यांच्या या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्ह यांनी ‘ट्रान्सप्लॅन्टोलॉजी’ ह्या शब्दाला जनकत्व दिले.
Category:
लेखसंग्रहदुसर्या महायुद्धाच्या काळात बॉम्बस्फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्यातच त्यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. त्यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्या. यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या सर्व १३० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
Category:
लेखसंग्रहअतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्णांच्या अतिमहत्त्वाच्या चाचण्यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्या वापरामुळे रुग्णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्येकांना जीवदान मिळाले आहे.
Category:
लेखसंग्रहअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. जन्मतःच हृदयात दोष असणार्या बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्यमान उंचावणारी शल्यचिकित्साडॉ. ब्लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्वी केली व त्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
Category:
लेखसंग्रहकार्डिअॅक कॅथेटरचा मानवी शरिरावर वापर करण्याचे श्रेय डॉ. वेर्नर फोर्समान या जर्मन डॉक्टरला जाते. डॉ. फोर्समान यांनी प्रथम मानवी शरिरावर कार्डिअॅक कॅथेटर वापरून पाहिला इतकेच नव्हे तर एक्स-रे मशीन वापरून त्याची प्रतिमाही तयार केली. डॉ. फोर्समान यांची ही कहाणी केवळ रोचकच नव्हे तर एखाद्या रहस्यकथेप्रमाणे रोमहर्षक आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti