साहित्य - ललित

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

Category:

 

रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

  January 22, 2015


साहित्य - ललित

शांतता ( Silence )

Category:

 

शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतता नव्हे. ती लागते मनाच्या स्थरावर देखील. शांतता म्हणजे केवळ आवाज नसणे, हे अभिप्रेत नाही. त्या वातावरणात देखील खऱ्या शांततेचा मागोवा घ्यावा लागतो. शोध घ्यावा लागतो. तीलाच खरी मनाची शांतता म्हणता येईल.

  January 12, 2015