पाणी पाणी
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमाझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे.
माझे बालपण चाळीतून चालू झाले, घरात दोन नळ होते पण त्यातून पाणी आल्याचे मी कधी पाहिले नव्हते. पुस्तकातल्या चित्रात केवढा पाण्याचा झोत दाखवीत. सार्वजनिक मोरीतील नळाला रात्री २ तास करंगळीच्या धारे इतके पाणी येत असे. तेथील झुंबड व बाचाबाची नित्याची होती. पाणी भरणे व ते विविध भांडयात साठविणे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे बालपणापासून हेच पहिले संस्कार होते.
November 12, 2018