लेखसंग्रह

एक प्रश्नचिन्ह

Category:

 

सुख-दु:ख , यश -अपयश , लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी-कधी परिस्थितींना तोंड देत असताना कितीतरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो कि माझ्याबरोबरच असे का झाले ?…. माझ्याच जीवनात अशी लोक का आली ? इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते ?…….. प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जो पर्यन्त त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तो पर्यन्त मनात विचारांचे वारे वाहतच राहतात.

  October 5, 2021


लेखसंग्रह

श्राद्ध म्हणजे ऋणमुक्ती

Category:

 

भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.

  September 26, 2021


लेखसंग्रह

ब्रह्म मुहूर्त

Category:

 

गेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून जर सफलतेचे शिखर गाठायचे असेल, समाधानी जीवन जगायचे असेल तर ब्रह्म मुहूर्ता मध्ये उठून स्वतःला प्रशिक्षित करावे. मन प्रसन्न व शक्तिशाली झाले तर शारीरिक समस्या ही समाप्त होतील.

  September 22, 2021


लेखसंग्रह

दुःख स्वीकारावे स्वानंदे

Category:

 

आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.

  September 21, 2021


लेखसंग्रह

धन्यवाद मंत्र

Category:

 

वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही.

  September 17, 2021


क्रोधावर नियंत्रण
लेखसंग्रह

क्रोधावर नियंत्रण

Category:

 

पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते.

  September 14, 2021


लेखसंग्रह

पंचामृत

Category:

 

हिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य.

  September 12, 2021


लेखसंग्रह

गणपती रहस्य

Category:

 

…… अश्या अनेक रहस्यानी भरलेले गणरायाचे रूप आपल्याला अनेक गुणांनी भरपूर करण्याची प्रेरणा देत आहे. आपण त्यांच्या रूपाला न्याहाळताना त्यांच्या गुणांना स्मृति मध्ये ठेऊन त्यांची पूजा अर्चना करावी व आपल्या जीवनातील विघ्न नष्ट करावे.

  September 10, 2021


लेखसंग्रह

पालकत्व

Category:

 

आज सर्वात जास्त मोह असलेल नातं ‘पालक आणि बालक’ हे नातं तणावाचे कारण बनले आहे. ह्या कोरोंना काळामध्ये मुलांच्या भविष्याला घेऊन सर्व पालक चिंतित आहेत. फक्त भविष्य नाही पण आज ह्या नात्यामध्ये जो दुरावा वाढत चालला आहे त्यामुळे ही चिंता वाढत चालली आहे. प्रत्येक पालकांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतात की ‘ आजची मुलं म्हणजे…. ’. खरंच का ही मुलं इतकी धुमाकूळ घालतात की आपल्याला त्यांना सांभाळणं इतकं कठीण होऊन जातं?

  September 9, 2021


लेखसंग्रह

स्पंदन

Category:

 

आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे.

  September 3, 2021