साहित्य - ललित

बलात्कार

Category:

 

घरात बंदिस्त केल्यावर मुलीला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती डिप्रेशनमधे गेली. तिला आवश्यक आणि चालू असलेली औषधे इतकी तीव्र होती की मुलगी जागी असतानाही अर्धवट झोपेत असल्यासारखी असायची. आणि ती या धक्यातून बाहेर येणे जवळ जवळ अशक्य होते.

  August 25, 2022


साहित्य - ललित

सुटका

Category:

 

बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं.

  August 24, 2022


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)

Category:

 

वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव.

  June 18, 2022


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गरीबीला अश्रूंचे वावडे

Category:

 

“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं.

  June 16, 2022


साहित्य - ललित

शिक्षित आणि सुशिक्षित

Category:

 

मनात आलं .. हे आपले पद आणि पदव्या मिरवणारे शिकलेले असतील , सावरलेले नव्हेत. इतरांना सावरून घेणे ज्यांना जमते त्यांना सावरलेले म्हणावं. हे प्रचंड शिक्षित असतील पण सुशिक्षित निश्चितच नव्हेत.

  June 14, 2022


साहित्य - ललित

उत्कट

Category:

 

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

  June 11, 2022


साहित्य - ललित

विकृती

Category:

 

दुसऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी करताना एखाद्या गुन्हेगाराने क्रौर्याची परिसीमा ओलांडण्याचे प्रकार पोलिस अनेक वेळा पाहतात.विशेषतः जातीय दंगलीमध्ये त्याचे जास्त अनुभव येतात. मात्र समोरच्या व्यक्तीच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन तिचा सातत्याने छळ करत राहणे ही विकृतीच. त्यातूनही एका स्त्री स्वभावात तिचे दर्शन होणे हे आणखी क्लेशदायक. १९९८ मधे दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असतानाची ही कथा.

  June 9, 2022


साहित्य - ललित

आई ती आईच – भाग एक

Category:

 

सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली.

  June 7, 2022


साहित्य - ललित

रि युनियन

Category:

 

संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले.

  June 4, 2022


साहित्य - ललित

अपना इंडिया

Category:

 

सन २००५ आणि २००६ या कालावधीत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस असताना या शहराचा गाभा माझ्या अधिकार क्षेत्रात मोडत होता. रेल्वे स्टेशन ला लागून असलेला बी केबिनचा भाग, ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी,पाच पाखडी, चंदन वाडी, खोपट, चरई, उथळसर, कोलबाड इ. इ.

  June 2, 2022