नॉस्टॅल्जिया

मे महिन्याची सुट्टी

Category:

 

पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे.

  May 14, 2019


लेखसंग्रह

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

Category:

 

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो.

  March 11, 2019


लेखसंग्रह

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

Category:

 

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

  March 10, 2019


नॉस्टॅल्जिया

टीव्हीच्या आठवणी…

Category:

 

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे..

  February 22, 2019


लेखसंग्रह

बुलढाण्यातली मराठी बोली

Category:

 

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे.

  October 17, 2018