अवर्गिकृत

फ्री ची चंमंत ग.

Category:

 

सध्या मुक्काम पोस्ट अमेरिका.इथे हव्या त्या गोष्टी करायला वेळ नेहमी पेक्षा अधिक मिळतो. दहा बारा दिवसांपासून f b वर एक add येत होती. online कोर्स उपवास पदार्थ, मुखवास, इन्स्टंट मसाले.इ.हे सगळे free कोर्स होते. मात्र त्यांची भारतीय वेळ होती दुपारी 3. मला ते कोर्स करणे शक्य नव्हते.याचे कारण इथे या वेळेस मध्य रात्रीचे अडीच वाजलेले असतात.म्हणून तो नाद सोडून दिला.तीन चार दिवसांपूर्वी हाॅटेलच्या चवी प्रमाणे भाज्या घरच्याघरी बनवा अशी add आली.

  August 26, 2023


नॉस्टॅल्जिया

डिक्शनरी आणि डिरेक्टरी

Category:

 

डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.

  August 24, 2023


अवर्गिकृत

सरकते जिने

Category:

 

मी सर्वप्रथम अमेरिकेत अपूकडे गेले ती 1998 साली.म्हणजे 25 वर्षांपूर्वी…. !पहिल्यांदाच विमानाचा प्रवास..आणि तो देखील इतक्या दूरचा आणि एकटीने करायचा… ! मी मुंबईतही कधी एकटीने प्रवास केल्याचं मला आठवत नाही.सासरी जायचं असो नाहीतर माहेरी जायचं असो.

  August 22, 2023


अवर्गिकृत

पाऊस आणि हिरव्या मिरच्या

Category:

 

त्यांच्या कुजबुतीतून एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं, “बारीश के दिनो में गरमागरम समोसे के साथ हरी मिरची का मजा तो कुछ और ही रेहता हैं”।

  August 21, 2023


कथा

पाहारेदार

Category:

 

सातपुड्याच्या पायथ्याशी येळकोटवाडी नावाचं गाव व्हतं. साधारण दीड दोन हजार वस्तीचं गाव.. गाव तसं लहानच… गावाला खंडूबा प्रसन्न व्हता… गावात शिरताच म्होहर च खंडूबाचं देवुळ व्हतं …या खंडूबाच्या देवळाच्या रावळात एक माणूस बशेल असायचा… दिसा तो नसायचा पण रातीला तो तिथंच गवसायचा… त्याचं नाव पांडबा…

  August 13, 2023


लेखसंग्रह

पुरुषपण भारी देवा

Category:

 

कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना?

  August 13, 2023


अवर्गिकृत

लंडनचा पाऊस

Category:

 

कोणत्याही गावातला पाऊस मला खूप आवडतो. कोकणातला आठ आठ दिवस संतत धार धरणारा पाऊस तर सर्वात आवडता. ठाण्याचा ही आवडतोच पण तो फक्त घरात बसून बघायला. आपल्याकडे पावसाळा हा सेपरेट ऋतू आहे आणि साधारण त्याच काळात आपण पाऊस अनुभूवू शकतो. लंडन मध्ये ही ऑक्टोबर ते जानेवारी असा ऑफिशियली पावसाळा जाहीर केलेला असला तरी इथे पाऊस वर्षभर आणि कधी ही पडतो. पावसामुळे क्रिकेटच्या किंवा विम्बल्डनच्या मॅच वर पाणी फिरल्याचे आपण अनेक वेळा बघितलं आहेच.

  August 12, 2023


लेखसंग्रह

पुरस्कार वापसी

Category:

 

केंद्र सरकार वा राज्य सरकारच्या वतीने वेळो वेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतात. वास्तविक हें पुरस्कार म्हणजे सरकार कडुन मिळणारा सन्मान असतो. तो काही एखाद्या व्यक्ती कडुन मिळणारा सन्मान नसतो तर संविधानांतर्गत मिळालेला असतो. त्या त्या वेळी जो कोणी पक्ष सत्तेत असतो वा व्यक्ती हि फक्त निमित्त मात्र असते.

  August 5, 2023