अवर्गिकृत

हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश

Category:

 

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते.

अवर्गिकृत

लोकमान्य व गीतारहस्य

Category:

 

मंडाले, ब्रह्मदेश (आजचा म्यानमार) येथे सहा वर्षांची राजद्रोहाची शिक्षा भोगत असताना आयुष्यभर केलेल्या गीता चिंतनातून लोकमान्यांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’ या अपूर्व व अजरामर ग्रंथास आता शंभर वर्षे झाली आहेत.

– ग. ना. कापडी, पर्वरी

अवर्गिकृत

वेळेचा अपव्यय

Category:

 

जनता केंद्रातील सरकारला उबगलेली आहे. अशा वेळी त्या लाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची तयारी करण्याऐवजी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा विषय टोकापर्यंत ताणून धरणे हितकारक नाही.

अवर्गिकृत

फुगा फुटायची वेळ

Category:

 

अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्‍या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे.

श्री. परेश प्रभू
संपादक, नवप्रभा

अवर्गिकृत

तरच कत्तलखाने बंद होतील !

Category:

 

यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.

अवर्गिकृत

राजकारणातील गुन्हेगारीची नाकाबंदी!

Category:

 

साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?

अवर्गिकृत

ट्विटर’ आणि सरकार

Category:

 

‘ट्विटर’ हे अमेरिकी संकेतस्थळ आहे आणि त्याचे भारतात कार्यालयही नाही. सरकारने बंदी घालायचे ठरवले तरी त्यांनी मनात आणले तर अनेक प्रकारे ही बंदी झुगारून ‘ट्विटर’ सुरू राहू शकते. जेथे ‘विकीलिक्स’ ला अमेरिका नमवू शकली नाही, तेथे भारताची काय पाड? त्यामुळे सरकारने उगाच स्वतःचे हसे करून घेऊ नये.

श्री. परेश प्रभू

संपादक, नवप्रभा

लेखसंग्रह

“मनसे”ला नवी दिशा

Category:

 

मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर हिंसाचार करणार्‍या दंगेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवा काढलेला मोर्चा आणि नंतरची विराट जाहीर सभा या संघटनेच्या यापुढील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊनही अत्यंत शांततामय रीतीने ही सभा आणि मोर्चा पार पाडून मनसेने आपली संघटना ही हुल्लडबाजांची संघटना नाही आणि आपल्याकडे यापुढील काळात अधिक गांभीर्याने पाहावे लागेल असेच जणू सूचित केलेले आहे.

श्री. परेश प्रभू
संपादक, नवप्रभा

अवर्गिकृत

कुशल संवादपटू विलासराव

Category:

 

माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्‍याशी ताजे होत डवरले. 

– सुधीर गाडगीळ