अवर्गिकृत

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर- १० – इतिहास संशोधक सावरकर

Category:

 

“इंडिया ऑफिस “ ह्या सरकारी कार्यालयातले एक संबंध दालन १८५७ च्या ग्रंथ व फाइल्स यांनी भरलेले होते. सुदैवाने सावरकरांना याचा अभ्यास करायची परवानगी मिळाली. तिथे तासतास बसून महत्वाची टिपणे काढली. ते पाहून त्या ग्रंथपालला आश्चर्य वाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी गुप्त कागदपत्रेसुद्धा सावरकरना अभ्यासायला दिली. याचा उल्लेख त्यांनी “शत्रूच्या शिबिरात “ आत्मचरित्रात केला आहे. आणि त्यांनी १८५७ चे बंड नव्हते तर स्वातंत्र्य समर होते हे  सिद्ध केले.

लेखसंग्रह

अष्टपैलू अभिनेता – ओम प्रकाश

Category:

 

त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की त्यांना भूमिकेची लांबी बघायची गरज भासली नाही. चरित्र भूमिकेचे ते बादशाह होते. त्यांच्या काही चरित्र  भूमिका इतक्या ताकदीच्या होत्या की त्या चित्रपटांचे तेच हीरो होते. अन्नदाता, बुढा मिल गया हि त्याची उदाहरणे, साधू और शैतान मधील खजानजी,गोलमाल मधील इन्स्पेक्टर, पडोसन मधील मामा,चमेली की शादी मधील कुस्ती  वस्ताद, नामक हलाल  मधील ददु,शराबी मधील मुनशी  जंजीर मधील अमिताभला निनावी टीप देणारा डि सीलव्हा,आणि चुपके चुपके मधील जिजाजी कोण विसरेल.

अवर्गिकृत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Category:

 

मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.

अवर्गिकृत

भारतीय चंद्रयान मोहिमेचे मुख्य डी. के. सिवन

Category:

 

२०१८ साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवान यांच्या हाती देण्यात आली आहे. त्या आधी म्हणजेच २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते.

अवर्गिकृत

ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन

Category:

 

आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.